पालघर पोलिसांची कारवाई : अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे तिघे अटकेत
१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पालघर / नवीन पाटील
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी कडक सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, पालघरने मोठी कारवाई केली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करून तब्बल १,०६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दिनांक २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील हिमाचल पंजाब ढाब्यासमोर संशयास्पद वाहने तपासण्यात आली. यावेळी DD03R9277 क्रमांकाचा आयसर टेम्पो अडवून तपासला असता, त्यात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
अटक आरोपींची नावे अशी आहेत –
१) मोहम्मद अरबाज जमीरउल हक (२२, रा. प्रतापगढ, उत्तर प्रदेश),
२) दिलशाद शमशाद अली (२९, रा. प्रतापगढ, उत्तर प्रदेश),
३) नेनाराम छबुजी गुजर (४८, रा. राजसमंद, राजस्थान).
आरोपींविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८६/२०२५ भा.दं.वि. कलम १२०(ब), २७२, २७३, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २, २(२), २६(२)(iv), २७, ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.निरीक्षक जितेंद्र कांबळे करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पो.उप.निरीक्षक सुनिल सावंत-देसाई, पो.हवालदार भगवान आहाड, पो.अमलदार बजरंग अमनवाड, नरेश घाटाळ, विशाल कडब सरं (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) यांनी केली.