निक्की नगर चौकात पहाटे गोंधळ; खडकपाडा पोलिसांची तिघांना ताब्यात घेऊन कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निक्की नगर चौकात शुक्रवारी (१९ डिसेंबर) पहाटे एक ते दीड वाजण्याच्या सुमारास आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी दोन तरुणी व एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम आशा बर्वे (२२, व्यवसाय : शिक्षण, रा. रूम नं. ००१, बी विंग, न्यू गंगा–यमुना सोसायटी, आग्रा रोड, लालचौकीजवळ, मोहिंदर सिंग हायस्कूल परिसर, कल्याण) तसेच त्याच्या मैत्रिणी वैष्णवी अवसरकर व तन्मयी खांडेकर हे तिघेही निक्की नगर चौकात गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.