पोहण्याचा मोह आवरला नाही अन् झाला घात;१० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका १० वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज भास्कर चाबुकस्वार असे या मुलाचे नाव आहे. राज त्याच्या मित्रासोबत ठाण्याच्या उपवन तलावात फिरायला गेला होता.तिथे त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही आणि तलावात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेने चाबुकस्वार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वर्तक नगरच्या भीमनगर परिसरात राहणारा राज चाबुकस्वार हा १० वर्षीय मुलगा त्याच्या मित्रासोबत ठाण्यातील उपवन तलावाजवळ फिरायला गेला होता.यावेळी तलावातल पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही, आणि तो थेट तलावात उतरला होता.यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.
खरं तर काही दिवसांपूर्वीच मुंबई ठाणे परिसरात पुरजन्य परिस्थिती होता.अशापरिस्थितीत तलाव तुंडून भरले असेलच. या परिस्थितीत पोहण्यासाठी पाण्यात उतरणे हे धोकादायकच होते.त्यामुळे अशी घटना घडणे साहजिक होते.त्यामुळे किमान कुटुंबियांनी तरी मुलांना जाण्यापासून रोखणे गरजेचे होते. दरम्यान राजच्या मृत्यूने चाबुकस्वार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण आहे.