महिंद्रा थार चोरी प्रकरणाचा उलगडा; माटुंगा पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपी अटक
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : माटुंगा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत महिंद्रा थार चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला असून आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. चोरीस गेलेली काळ्या रंगाची महिंद्रा थार (अंदाजे किंमत ₹१२ लाख)ही पोलिसांनी हस्तगत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीची काळ्या रंगाची महिंद्रा थार (क्र. UP78-GV-2977) ही दिनांक १५ ते २५ जुलै २०२५ दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरली होती. याप्रकरणी गुन्हा क्र. १८२/२५, कलम ३७९ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मानखुर्द परिसरातून दत्तात्रय सर्जेराव पवार (वय २४, रा. टी. बाहेरील आळी, गाव खटाव, ता. खटाव, जि. सातारा) याला अटक केली. पोलिसांनी चोरीस गेलेली थार जप्त केली असून आरोपीकडून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईत मा. पोलीस आयुक्त, मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण, मा. अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) श्री. विक्रम देशमाने, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०४) श्रीमती रागसुधा आर., मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (माटुंगा विभाग) श्री. सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (माटुंगा) श्री. राजेंद्र पवार, पोनि. गुन्हे श्रीमती प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उ.नि. सुनिल पाटील, पोशि. जुवाटकर, पोशि. देशमाने, पोशि. बहादुरे, पोशि. तोडासे, पोशि. मेटकर व पोशि. सोनवलकर यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग नोंदवला. पुढील तपास पो.उ.नि. सुनिल पाटील करीत आहेत .माटुंगा पोलिसांच्या दक्षतेमुळे लाखोंची महिंद्रा थार परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.