भिवंडीतील कशेळी खाडीत ५३ वर्षीय व्यक्तीने उडी घेत केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – मुंबई, कोकण येथील घटना ताजी असतानाच आता भिवंडी येथील कशेळी खाडीत ५३ वर्षे वयाच्या इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी मैत्री दिनाच्या सकाळीच साधारण साडेआठ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व टीडीआरएफच्या जवांनांनी घटनास्थळी धाव घेतली. खाडीतील पाण्यात उडी घेणारा व्यक्ती बुडाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. मात्र, अद्याप संबंधित व्यक्तीचा कुठलाही शोध मिळालेला नाही.
ठाणे महापालिकेच्या टी.डी.आर.एफच्या जवानांकडून मागील सात तासापासून शोध कार्य सुरू आहे. दरम्यान, उडी घेणाऱ्या व्यक्तीची माहिती अद्याप मिळाली नसून घटनेचं कारणही समजू शकले नाही.टीडीआरएफचे जवान कशेळी खाडीत उतरले असून बोटीतून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी नातेवाईक व स्थानिकांनीही गर्दी केल्याचं दिसून आली.