सफलता लॉजिंग प्रकरण : डी.के. रावच्या नावाने मूळ मालकाला धमकी; टिळकनगर पोलिसांकडून तपास सुरू

Spread the love

सफलता लॉजिंग प्रकरण : डी.के. रावच्या नावाने मूळ मालकाला धमकी; टिळकनगर पोलिसांकडून तपास सुरू

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चेंबूर येथील सफलता लॉजिंग अ‍ॅन्ड बोर्डिंग प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, लॉजिंगचे मूळ मालक महेश आचार्य यांना डी.के. राव या कुख्यात गँगस्टरच्या नावाने धमकावल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार आचार्य यांनी टिळक नगर पोलिसांकडे दिली असून, पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

तक्रार अर्जानुसार, काही वर्षांपूर्वी दिवाकर प्रजापती नामक व्यक्तीने सफलता लॉजिंग भाडेतत्त्वावर घेतले होते. ठरावीक कालावधीसाठीचा करार संपल्यानंतरही दिवाकरने नवीन करार न करता जागेवर कब्जा कायम ठेवला. मूळ मालक महेश आचार्य यांनी करारासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र दरवेळी टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान, महेश आचार्य सध्या आरोग्य कारणास्तव हैदराबाद येथे उपचार घेत असून, बेडरेस्टवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत दिवाकरने खोटे कागदपत्र सादर करून अडानी एनर्जीकडून वीजबिल आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे, महेश आचार्य यांच्या म्हणण्यानुसार, दिवाकर प्रजापती आणि त्याचा सहकारी कार्तिक नाडार यांनी स्वतःला ‘डी.के. रावचा माणूस’ असल्याचे भासवून त्यांना धमकावले. त्यामुळे ते प्रचंड दहशतीखाली असून, संबंधित अधिकाऱ्यांना व आपल्या वकिलामार्फत तक्रारी सादर केल्या आहेत. पोलिसांनी अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आचार्य यांच्या वकिलांकडून करण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिलकनगर पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत आणि संबंधित व्यक्तींचा मागोवा घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon