शिक्षिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारला कॉलिन स्प्रे; पालकांच्या तक्रारीनंतर शाळेला कुलूप ठोकलं
योगेश पांडे / वार्ताहर
नालासोपारा – नालासोपारा येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. नालासोपारा येथील एका शिक्षिकेने ८ वर्षील मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर कॉलिन स्प्रे मारला. मुलाने हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितला. पालकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर चौकशीतून शाळा कायमची बंद करण्यात आली. या एकूणच प्रकारामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथील हॉवर्ड इंग्लिश स्कूलमधील निदाह निजाउद्दीन नावाच्या एका शिक्षिकेने ८ वर्षांच्या एका मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर स्प्रे मारला. पालकांनी या घटनेची तक्रार केली. त्यानंतर शिक्षिकेनी माफी मागितले. या प्रकरणात राज्य शिक्षण विभागाच्या चौकशीमध्ये शाळेने गंभीर गैरवर्तन केल्याचे उघड झाले आणि शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
२३ जुलै रोजी वर्गात दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर कॉलिन स्प्रे केल्याची घटना घडली. विद्यार्थ्याच्या पालकांना जेव्हा हा प्रकार समजला, तेव्हा शिक्षिकेने अधिकृत माफी मागितली. या घटनेनंतर हावर्ड इंग्लिश स्कूल राज्य शिक्षण विभागाच्या रडारवर आले. तपासामध्ये ही शाळा छत्रपती संभाजीनगरच्या वेगळ्या शाळेकडून सोडतीचा दाखल देत असल्याचे समोर आले. यामुळे शाळेची नोंदणी आणि वैधतेबाबत शंका निर्माण झाली. तपासानंतर आलेल्या अहवालाची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेने तालुकास्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे. ही शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शाळेच्या गैरवर्तनामुळे पालक आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये संताप निर्माण झाला आहे.