कुर्ला विद्या विहारमध्ये अंमली पदार्थांची मोठी कारवाई : १६ ग्राम एमडीसह रहमान अतीक मालिकला अटक

Spread the love

कुर्ला विद्या विहारमध्ये अंमली पदार्थांची मोठी कारवाई : १६ ग्राम एमडीसह रहमान अतीक मालिकला अटक

रवि निषाद / मुंबई

मुंबई – कुर्ला पश्चिम परिसरात विनोबा भावे नगर पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई करत १६ ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थासह रहमान अतीक मालिक (वय २८) या तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई २२ जुलै रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास विद्या विहार रोडवरील टी-जंक्शन भागात करण्यात आली. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक इसम टी-जंक्शन परिसरात अंमली पदार्थासह येणार असल्याचे समजले. यावरून पोलीसांनी तत्काळ कारवाई करत रहमान अतीक मालिक याला ताब्यात घेतले. शरीरझडती दरम्यान त्याच्याकडे १६ ग्रॅम एमडी (ज्याची अंदाजे बाजार किंमत रु. १,६०,०००/-) सापडले तसेच १६ ग्राम एमडी (मेफेड्रॉन) रु. १,६०,०००/-, मोबाईल फोन (१ नग) रु. १०,०००/- व सुझुकी बर्गमॅन मोटारसायकल (एमएच-४७-डीके-२१६५) रु. ६०,०००/- एकूण रु. २,३०,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आली. रहमान अतीक मालिक याच्याविरुद्ध वि.स्था.गु.र. क्र. ४७८/२०२५ अन्वये एनडीपीएस ऍक्ट १९८५ च्या कलम ८(क), २२(ब) नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली
रात्रपाळी पर्यवेक्षक पो.नि. अशोक पवार, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब सोनवणे, पोलीस कर्मचारी पंचरस, पाटील, राठोड, पवार आणि मेढे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे कुर्ला परिसरातील अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा धक्का बसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे ही बक्षीसपात्र व उल्लेखनीय कामगिरी नागरिकांतून कौतुकास पात्र ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon