ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसांना अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
नालासोपारा – नालासोपारा येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. ड्राइविंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून दोन वाहतूक पोलिसांना पकडत खाली पाडून अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे. मारहाण करणारे दोघं बापलेक असून नालासोपरातीलच राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या भर रस्त्यात सुरू असलेल्या या पोलीस आणि मारहाण करणार्यांचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, ड्राइविंग लाइसेंस नसलेला मुलगा गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याला अडवलं आणि लायसन्सआणि इतर कागदपत्रांबद्दल विचारणा केली. यावर चिडून मुलाने आपल्या वडिलांना बोलावून घेतलं आणि पोलिसांशी वाद घातला. दरम्यान या दोघा बापलेकांनी चक्क वाहतूक पोलिसांनाच मारहाण केली आहे. मंगेश नारकर आणि पार्थ नारकर असे मारहाण करणाऱ्या बापलेकाचे नाव आहेत. तर पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस कॉस्टेबल शेषनारायण आठरे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांची नाव आहेत. नालासोपारा पूर्व नागीनदास पाडा सीतारा बेकारीच्या समोर मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास तुलिंज पोलीस करत असून पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.