जिल्हाधिकारी आदेशाशिवाय दस्त नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम निबंधक राजाराम परब यांचं निलंबन करण्याची मागणी

Spread the love

जिल्हाधिकारी आदेशाशिवाय दस्त नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम निबंधक राजाराम परब यांचं निलंबन करण्याची मागणी

अंबरनाथ – अंबरनाथ पूर्व येथील सर्वोदय हौसिंग सोसायटीच्या सदनिकांचे दस्त जिल्हाधिकारी यांचा स्पष्ट आदेश नसताना नोंदणी केल्याच्या गंभीर आरोपाखाली उल्हासनगर ४, बदलापूर कार्यालयातील सह दुय्यम निबंधक राजाराम परब सध्या अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर तातडीने निलंबन करून सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

प्रकरणाचा तपशील:

दस्त नोंदणी क्रमांक:
१००२९/२०२४
दिनांक: २४/०७/२०२४
दस्तावेज प्रकार: सेल डीड
स्थळ: सर्वोदय हौसिंग सोसायटी, अंबरनाथ (पूर्व)

तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणताही लेखी परवानगी आदेश नसतानाही श्री. परब यांनी सदर दस्त नोंदणी केली. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याची आणि कायद्याचा भंग केल्याची शक्यता आहे.

याप्रकरणी श्रमिक (मु) पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुधीर गुजर यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय न्याय संहिता खालील २०१, सरकारी सेवकाने कायदेशीर कलमांखाली कुठे दस्ताऐवज तयार करणे, भारतीय न्याय संहिता – १८६, चुकीची माहिती देणे / खोटी नोंद, भारतीय न्याय संहिता – ३१८, फसवणूक, भारतीय न्याय संहिता – ३३६ व ३४०, बनावट दस्तऐवज तयार करणे व वापरणे तसेच भारतीय न्याय सहिता – ३१६, विश्वासघात व अपहार या कलमांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या मते, या व्यवहारात लाच घेण्याचा संशय असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित दस्त तत्काळ रद्द करण्यात यावा. प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सह दुय्यम निबंधक राजाराम परब यांच्यावर निलंबन व पुढील चौकशीची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon