श्रावण मासानिमित्त आयआरसीटीसीकडून खास ज्योतिर्लिंग हवाई तीर्थयात्रा पॅकेज; मुंबई-पुण्यातून विविध आध्यात्मिक स्थळांना थेट प्रवास
मुंबई : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित उपक्रम – यांनी श्रावण महिन्याच्या निमित्ताने भक्तांसाठी विशेष “श्रावण स्पेशल ज्योतिर्लिंग हवाई पॅकेज” ची घोषणा केली आहे. पश्चिम विभाग मुंबईचे समूह महाव्यवस्थापक श्री. गौरव झा यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
या हवाई पॅकेज अंतर्गत भक्तांना मुंबई आणि पुण्याहून थेट द्वारका-सोमनाथ, महाकालेश्वर-ओंकारेश्वर आणि काशी विश्वनाथ-बैद्यनाथ या पवित्र ज्योतिर्लिंग स्थळांच्या यात्रेचा लाभ घेता येणार आहे. यात्रा संपूर्णपणे नियोजनबद्ध, सुरक्षित आणि बजेटमध्ये बसणारी असून श्रावण महिन्याच्या धार्मिक पार्श्वभूमीशी सुसंगत आहे.
पॅकेज तपशील पुढीलप्रमाणे:
द्वारका आणि सोमनाथ यात्रा
▪️ प्रस्थान:
मुंबईहून – ३१ जुलै व १४ ऑगस्ट २०२५
पुण्याहून – १० ऑगस्ट २०२५
▪️ कालावधी: ३ रात्री / ४ दिवस
▪️ किंमत: प्रतिजण ₹२६,७०० (ट्विन शेअरिंग बेसिसवर)
महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर यात्रा
▪️ प्रस्थान: मुंबई व पुण्याहून – १४ ऑगस्ट २०२५
▪️ कालावधी: ३ रात्री / ४ दिवस
▪️ किंमत: प्रतिजण ₹२८,५०० (ट्विन शेअरिंग बेसिसवर)
🔹 काशी विश्वनाथ आणि बैद्यनाथ यात्रा
▪️ प्रस्थान: मुंबईहून – ७ ऑगस्ट २०२५
▪️ कालावधी: २ रात्री / ३ दिवस
▪️ किंमत: प्रतिजण ₹२८,००० (ट्विन शेअरिंग बेसिसवर)
प्रत्येक पॅकेजमध्ये हवाई प्रवास, स्थलांतर, भोजन, प्रवेश शुल्क, निवास, प्रवास विमा व जीएसटी यांचा समावेश आहे. शिवभक्तांसाठी श्रावण महिन्यातील हे पॅकेज अध्यात्मिक उन्नतीसह ग्रहदोष आणि नकारात्मकतेपासून मुक्ती देणारे ठरणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 8287931886 या क्रमांकावर WhatsApp/SMS द्वारे संपर्क साधावा.