परिमंडळ ३ कल्याणमध्ये अंमली पदार्थ व लेडीज बारविरुद्ध मोठी कारवाई; परराज्यीय आरोपी अटकेत

Spread the love

परिमंडळ ३ कल्याणमध्ये अंमली पदार्थ व लेडीज बारविरुद्ध मोठी कारवाई; परराज्यीय आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण व डोंबिवली परिसरात अंमली पदार्थांचे विक्री जाळे उध्वस्त करण्यासाठी तसेच बेकायदेशीर लेडीज बारवर कारवाई करण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त यांच्या निर्देशानुसार विशेष कारवाई पथक आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे मोठी मोहीम राबवली. यामध्ये परराज्यीय आरोपींना अटक करण्यात आली असून, शंभरहून अधिक जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

(१) अंमली पदार्थ प्रकरण:

दि. २२ जून रोजी बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील बकरी मंडई परिसरात, रात्रीच्या सुमारास संशयास्पदरीत्या थांबलेल्या तीन आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एनरेक्स कफ सिरप’ (कोडाइन फॉस्फेट आणि ट्रायप्रोलिडाइन एचसीएल युक्त १०० मि.ली.च्या १२० सिलबंद बाटल्यांची (एकूण किंमत सुमारे ₹२७,०००/-) जप्ती करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तौसिफ आसिफ सुर्वे (३४ वर्षे) – राहिवासी कल्याण, बाजारपेठ, लिंगराज अपाराय आलगुड (४० वर्षे) – राहिवासी कलबुर्गी, कर्नाटक व इरफान उर्फ मोहसीन इब्राहीम सय्यद (३४ वर्षे) – राहिवासी गुलबर्गा, कर्नाटक यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) सह औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

(२) लेडीज बारविरुद्ध कारवाई:

दि. २१ जून रोजी कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सत्यम बार येथे अचानक धाड टाकण्यात आली. सदर कारवाईत एकूण ११३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, ५ पुरुष वेटर, ४१ महिला वेटर व ६३ ग्राहक यांना ताब्यात घेण्यात आले असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८७/२०२५ नुसार बीएनएस कलम २९६, २२३, ५४, ३(५) व महाराष्ट्र डान्सबार प्रतिबंधक कायदा २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बारमधील चार मुख्य आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही संयुक्त कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक, बाजारपेठ पोलीस ठाणे, व कोळसेवाडी पोलीस ठाणे यांनी एकत्रितपणे पार पाडली असून, अंमली पदार्थ व बेकायदेशीर बारविरोधात अशी कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon