लोणावळ्यात नराधम बापाचं पोटच्या मुलीसोबत विकृत कृत्य; पोलिसांनी नराधम बापाला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका नराधमाने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं घरात कुणी नसल्याचं बघून मुलीवर जबरदस्ती करत अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडितेच्या आईला मिळताच, तिने मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्याच्या जवळील कुसगावमध्ये ही घटना घडली. घटनेच्या वेळी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. मुलीला एकटं पाहून बापाची नियत बिघडली आणि त्याने तिच्यासोबत गैरकृत्य केले. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ही माहिती कुणाला दिलीस तर ठार मारेन, अशी धमकीही मुलीला दिली. पण आई घरी आल्यानंतर तिने सगळा प्रसंग आपल्या आईला सांगितला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. २० जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलगी घरी एकटी आहे याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला. घटनेची माहिती कुणाला सांगू नको यासाठी देखील आरोपीने मुलीला धमकी दिली होती. पण आई घरी आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. हे ऐकून मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. बापानेच पोटच्या मुलीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.