पालघर पोलीस दलाकडुन जागतिक योग दिन साजरा
पालघर / नवीन पाटील
पालघर – दिनांक २१/०६/२०२४ रोजीपालघर येथील लायन्स रोटरी क्लब सभागृह येथे जागतिक योगा दिनानिमित्ताने शनिवार २१ जून रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेकरीता पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच दांडेकर हायस्कूल, पालघर येथील विद्यार्थी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन मध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. उपस्थित पोलीस अधिकारी , पोलीस अंमलदार ,नागरिक व शाळेतील विद्यार्थी यांना योगा प्रशिक्षकामार्फत योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवुन योगाचे प्रशिक्षण व योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व पटवुन दिले.