घाटकोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी लोकलखाली अडकला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंब्रा स्टेशनवर लोकलमधून पडल्यानं ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यापाठोपाठ घाटकोपर स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घाटकोपर स्टेशनवर लोकलच्या खाली एक प्रवाशी अडकला होता. लोकलमधून उतरताना त्याचा पाय अडकला. लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या जागेमध्ये व्यक्ती अडकला होता. त्याला मोठ्या प्रयत्नानं बाहेर काढण्यात आले. त्याला जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.