लग्नाचं आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर अत्याचार; पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर

Spread the love

लग्नाचं आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर अत्याचार; पोट दुखू लागल्यानं धक्कादायक प्रकार समोर

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – बीडच्या माजलगाव येथे लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोट दुखू लागल्याने सदरील तरुणीची तपासणी केल्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्याचे समोर आले. ही घटना मे महिन्यात उघडकीस आली असून आता याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वीस वर्षीय तरुणीची सुनील अलजेंडे याच्याशी मैत्री झाली.त्यानंतर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. पोट दुखत असल्याने तिला आई-वडिलांनी रुग्णालयात नेले असता की पाच महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाल्यानंतर सुनील अलझेंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिकचा तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत.

पीडित तरुणी ही सुमारे २० वर्षांची असून, तिची ओळख सुनील अलझेंडे या तरुणाशी झाली होती. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले. सुरुवातीला लग्नाचे आश्वासन दिल्याने तरुणीने विरोध केला नाही. मात्र नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. मे महिन्यात तरुणीला सतत पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे ऐकून कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अनेकदा जबरदस्ती केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon