शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व साठवलेले सामान जळून खाक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील दहिसर येथील झेप्टोच्या गोदामात बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण अस्पष्ट असून एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली, अशी शक्यता वर्तवण्यात आली. या आगीत गोदामातील सर्व साठवलेले सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर येथील झेप्टोच्या गोदामात दुपारी तीन वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. परंतु, या आगीत सर्व साठवलेले सामान जळून खाक झाले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.