घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

Spread the love

घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली एनएमएमटी बस आगारात उभ्या असलेल्या बसेसना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन बसेस जळून खाक झाल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उशिराने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यापूर्वीच तीन बसेस पूर्णपणे जळून गेल्या होत्या.बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली. आगीत तीन बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तर आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. बस आगारातील काही सतर्क कर्मचाऱ्यांमुळे त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे. चालक वाहकांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला इतर उभ्या असलेल्या बस बाजूला नेण्यात यश आले आणि मोठी वित्तहानी टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon