किनवट तहसीलच्या दोन महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; सोळा हजाराची लाच भोवली
पोलीस महानगर नेटवर्क
नांदेड – वडिलोपार्जित जमीन त्याच्या पत्नीचा नावावर करण्यासाठी चाळीस हजाराची मागणी करून तडजोडीअंती सोळा हजाराची लाच स्वीकारताना किनवट तालुक्यातील निचपूर सज्जाच्या तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे व कणकवाडी सज्जाच्या तलाठी सुजाता शंकर गवळे यांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्या दोघांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीची वडिलोपार्जित ७ एकर शेत आहे. त्यापैकी अर्धी शेती साडे तीन एकर त्या व्यक्तीच्या पत्नीचे नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तो व्यक्ती कामाचे अनुषंगाने तलाठी तेलंगे यांना भेटले असता, त्यांनी प्रथम चाळीस हजार रुपये व तडजोडी अंती १७०००/- रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार त्या व्यक्तीने दि. २९/०५/२०२५ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली त्या अनुषंगाने दिनांक ०३/०६/२०२५ रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता, यातील तक्रारदार लोकसेविका तलाठी तेलंगे व तलाठी गवळी यांना भेटले.
तलाठी तेलंगे यांनी तक्रारदार यांना तलाठी गवले यांना भेटा असे सांगून त्यांच्या कडे पाठविले. तेव्हा तलाठी गवले यांनी तक्रारदार यांची फाईल घेऊन तलाठी तेलंगे यांना दाखवून त्यांना बोलून परत आले व तेलंगे मॅडम ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे करा असे म्हणाल्या त्यानंतर तक्रारदार यांनी तलाठी तेलंगे यांना कामाचे विचारले असता, तेव्हा तलाठी तेलंगे म्हणाले की त्यादिवशी सांगितले, त्यापेक्षा ३ हजार कमी केले. आरोपी लोकसेवक यांचे किनवट व नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू करण्यात आली. या प्रकरणी तलाठी तेलंगे आणि गवळी यांचेविरुद्ध पो.स्टे. किनवट, ता. किनवट, जि. नांदेड येथे भ्र.प्र. अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.. संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रिती जाधव, सहा. पोलीस उप निरीक्षक शेख रसूल, अरशद अहेमद खान, सयद खदीर व चापोह गजानन राउत सर्व नेम. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी हि कारवाई केली.