कल्याणमधील मलंगडच्या कुशिवली गावाजवळ दोघांचे झाडावर लटकलेले मृतदेह सापडल्याने खळबळ; प्रेम प्रकरणातून आत्महत्या झाल्याचा संशय

Spread the love

कल्याणमधील मलंगडच्या कुशिवली गावाजवळ दोघांचे झाडावर लटकलेले मृतदेह सापडल्याने खळबळ; प्रेम प्रकरणातून आत्महत्या झाल्याचा संशय

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. मलंगगड येथील कुशिवली गावाजवळ दोघांचे झाडावर लटकलेले मृतदेह सापडले आहेत. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय वर्तवला जातोय. हिललाईन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतली आहेत. शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगड येथील कुशिवली गावाच्या हद्दीत निर्जन ठिकाणी दोन मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी मिळाली. हिललाईन पोलिसांना तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात पाठवले. हे मृतदेह तरूण आणि तरूणीचे आहेत. हैराण करणारे म्हणजे मृतदेहांच्या शेजारी त्यांच्या बॅगाही आढळून आल्या आहेत.

घटनास्थळावरील दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतलीये. हे दोघेजण याच दुचाकीवरून आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हे दोघे प्रेमीयुगल असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी, असाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकारानंतर या परिसरात खळबळ. घटनास्थळी दुचाकी आणि बॅग देखील सापडल्याने हे दोघे इतर ठिकाणाहून आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांनी आत्महत्येसारखे पाऊल नेमके का उचलले याचा शोध घेतला जात आहे. शवविच्छेदनानंतर या प्रकरणात खुलासा होऊ शकतो. मात्र, सध्या हे आत्महत्या प्रकरण मोठे गुड बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon