पुण्यात शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर गोळीबार; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

Spread the love

पुण्यात शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर गोळीबार; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवरती मध्यरात्रीच्या सुमारास थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी थेट फायरींग केलं. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळी झाडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे हे गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते, त्याचवेळी बाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवरती गोळीबार करत हल्ला झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांचे गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. सोमवारी घारे हे आपल्या कार्यालयात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळबार केला. सुदैवाने घारे त्यांच्या गाडीमध्ये नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलीस तपास करत आहेत. निलेश घारे यांच्यावर गोळीबार करणारे कोण होते? त्यांच्यावर गोळीबार कोणी करायला लावल होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान पुणे शहर परिसरात सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे, अशातच काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत पसरवणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत, अशा घटनांमुळे पुण्यात भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon