कोरोना वन्स अगेन? ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – २०२० मध्ये कोविड -१९ नं जगभरात कहर केला होता. जग ठप्प झालं होतं. यानंतर तीन वर्षे यातून बाहेर पडण्यासाठी गेले. पण आता पुन्हा एखदा करोनाची लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. आशिया खंडातल्या काही देशात या आजाराचे रुग्ण अचानक वाढल्याचं दिसून येतंय. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोना पुन्हा एकदा पसरत असल्याचं समोर आलंय. यातच आता एका भारतीय अभिनेत्री पुन्हा करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला ही कोविड – १९ पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं हे सांगितलं आहे. नमस्कार, माझी कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सुरक्षित राहा, मास्क वापरा…असं तिनं पोस्टमध्ये म्हटलंय.
‘बिग बॉस १८’ ची स्पर्धक आणि नव्वदच्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोव्हिड १९ ची लागण झाली आहे. तिनं स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. २०२० आणि २०२१ मध्ये थैमान घातल्यानंतर ही महामारी पुन्हा एकदा डोकं वर काढू शकते, असं म्हटलं जात आहे. त्यामुळं लोक पुन्हा एकदा धास्तावलं आहेत. अभिनेत्रीनं सगळ्यांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. शिल्पा कोव्हिड पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचे चाहते आणि मित्रपरिवार तिची काळजी करत आहेत. सगळेजण तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देत आहेत.