१९ वर्षीय प्रियकराकडून आई समोरच अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; वेदनेने तिचा मृत्यू. महिला व प्रियकराला अटक

Spread the love

१९ वर्षीय प्रियकराकडून आई समोरच अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; वेदनेने तिचा मृत्यू. महिला व प्रियकराला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – एक अतिशय धक्कादायक घटना मुंबईच्या मालाड मालवणी भागत घडली आहे. पोलिसांनी एका ३० वर्षीय महिलेला आणि तिच्या १९ वर्षीय प्रियकराला, महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीच्या आधारे, मालवणी पोलिसांनी ३० वर्षीय महिला आणि तिच्या १९ वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. दोघांवरही भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात बलात्कार, खून आणि पोस्को असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत .आरोपी महिला आणि १९ वर्षीय आरोपी मुलगा यांच्यात अनैतिक संबंध होते. गर्भवती असताना तिचा पती तिला सोडून गेल्यानंतर तीन वर्षांपूर्वी महिलेचा घटस्फोट झाल्याचेही समोर आले आहे. यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला आणि आरोपी मुलाशी शारीरिक संबंध निर्माण झाल्यापासून ती तिच्या आईच्या घरी राहत होती. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री आरोपीने तिच्या आईसमोरच चिमुकलीवर बलात्कार केला. मुलगी वेदनेने ओरडत होती आणि नंतर तिचा मृत्यू झाला.

त्यानंतर मुलीला मालवणी जनकल्याण नगर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर, आरोपी आईने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आणि डॉक्टरांना सांगितले की मुलगी अपस्माराने ग्रस्त आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वैद्यकीय मूल्यांकन अहवालाच्या आधारे, आम्ही आरोपी आई आणि तिच्या प्रियकरावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या संबंधित कलमांखाली बलात्कारासह खून आणि पोस्को कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा मालवणी जनकल्याण नगर येथील सरकारी रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली आणि तपासणीदरम्यान मुलीला मृत घोषित केले. डॉक्टरांना मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon