मुंबईतील बांद्रा पश्चिम परिसरात ड्रग्स माफियांची कोंडी; पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी, तर बदनामीसाठी युट्युब चॅनलचा वापर
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – दैनिक पोलीस महानगर या मराठी वृत्तपत्राने बांद्रा पश्चिममधील ड्रग्स व्यवसाय करणाऱ्या माफियांची बातमी प्रकाशित केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अहवालानुसार, रामचंद्र मानबहादुर कतरी नावाचा युट्युबर, जो “चिंदी चोर” म्हणून ओळखला जातो, तो रुबिना नियाजू आणि निलोफर शेरअली सेंडोले या कुख्यात ड्रग्स माफियांचा जवळचा सहकारी आहे. याच चिंदी चोर कतरीवर चोरी, घरफोडी, ड्रग्स तस्करी, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे पाच गंभीर
स्वरूपाचे गुन्हे बांद्रा, खार, गोरेगाव पोलीस ठाणे आणि क्राईम ब्रँच युनिट ९ मध्ये दाखल झालेले आहेत.
१० एप्रिल रोजी दरगाह गल्लीत एका युवकाची हत्या झाली होती. मृताच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, ड्रग्सच्या विरोधामुळे ही हत्या झाली. मात्र पोलिसांनी याला मालमत्तेचा वाद मानून केस दाबण्याचा प्रयत्न केला.
अहवाल नंतरही रुबिना आणि निलोफर यांनी पुन्हा एमडी ड्रग्सची विक्री सुरु केली. वृत्तपत्राच्या टीमने बनावट ग्राहक पाठवून व्हिडिओ शूट केला आणि एएनसी पोलीस उपायुक्त श्री. शाम गुगे यांच्याकडे साक्ष पुरवले.
रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर दोघींनी पत्रकाराला व्हॉट्सअॅपवर जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावर अँटोप हिल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलायानंतर बांद्रा एएनसी, क्राईम ब्रँच व स्थानिक पोलिसांनी एकत्र कारवाई करून अनेक ठिकाणी छापे टाकले आणि ड्रग्ससह अनेकांना अटक केली. या कारवाईमुळे रुबिना कुरला वेस्टला पळून गेली असून, ती तिथूनच ड्रग्सचा व्यवहार करत असल्याची माहिती आहे. निलोफरने अटकेपासून वाचण्यासाठी विष घेतल्याचा बनाव करत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सतत चार दिवस आलेल्या रिपोर्टनंतर, बांद्रा वेस्टमधील ९०% ड्रग्स माफियांनी आपला गैरव्यवसाय थांबवला आहे. आता आरोप आहे की, रुबिना आणि निलोफरच्या सांगण्यावरून कतरी पत्रकाराला बदनाम करण्याचा कट रचत आहे. तो सध्या बांद्रा तलावाजवळ राहत असून, त्यांच्या प्रत्येक हालचालींमध्ये सहकार्य करत आहे.
कतरीला या ड्रग्स माफियांकडून महिन्याला लाखो रुपये मिळतात आणि तो बनावट पत्रकार म्हणून देशविरोधी कामांमध्ये गुंतला आहे. हे प्रकरण केवळ ड्रग्सपुरता मर्यादित नसून, पत्रकारांच्या सुरक्षिततेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.