दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा; ३ आरोपी अटकेत, १ कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश

Spread the love

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा; ३ आरोपी अटकेत, १ कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश

मुंबई – सायबर पोलिस ठाणे, पश्चिम विभाग, गुन्हे शाखा मुंबई यांनी ज्येष्ठ नागरिकांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत दिल्लीतील आनंद विहार, हरिनगर येथील मॅक्सिमायझर मार्केटिंग (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. यावेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून शेहजाद लाल मोह. खान उर्फ रेहमान (३०), अनुज उत्तमसिंग रावत उर्फ अनिल कुमार यादव (३०) व मोह. आमिर हुसेन (३४) या टोळीने स्वत:ला बजाज फायनान्सचे कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे पाठवून फिर्यादीकडून एकूण १.१४ कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यात जमा करवून घेतले होते.

सदर आरोपींकडून १०५ मोबाईल फोन, १ लॅपटॉप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस तपासात या मोबाईल फोनचा वापर देशभरातील १३२ सायबर गुन्ह्यांमध्ये झाल्याचे उघड झाले असून, करोडोंची फसवणूक या टोळीने केली असल्याचा संशय आहे.

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून १.१४ कोटींच्या सायबर फसवणुकीतील आरोपींना अटक करण्याची ही प्रभावी कारवाई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे श्री. दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त, सायबर विभाग श्री. राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्ताराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तसेच दिल्ली गुन्हे शाखा व १४ दि पथक यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सहायक पोलीस निरीक्षक पुनम जाधव

सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाचंगणे, पो. ना. दिपक तायडे, पो. ह. सचिन सावंत, पो. शि. केशव तकीक, पो. शि. अमोल फाफळे, पो. शि. दिपक पडळकर, पो. शि. राहुल भडांगे, पो. शि. प्रितम व्यवहारे या टीमने एकजुटीने आणि काटेकोर नियोजनातर्फे ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon