कळवा पारसिक रेतीबंदर खाडीत बुधवारी एका अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – कळवा येथील पारसिक रेतीबंदर खाडीत बुधवारी एका अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.पोलीसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे.मृताची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती कळवा पोलीसांनी दिली आहे. कळवा येथील गणपति विसर्जन घाट जवळ असलेल्या पारसिक रेतीबंदर खाडी मध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह ख़ाडीच्या किनाऱ्या जवळ आढडळा.याची माहिती स्थानीकांनी कळवा पोलिस ठाण्याळा दिली. माहिती मिळताच कळवा पोलिस ठाण्याचे पथक,ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ति व्यवस्थापन विभागचे पथक घटनास्थली दाखल झाले.
या वेळी स्थानिक नागरिक आणि पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने ख़ाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला.कळवा पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे.या व्यक्तिचा मृतदेह कळवा पोलिस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाही साठी शववाहिकेतून छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. या मृतदेहाची ओळख पटवीण्याचे सुरु असल्याचे कळवा पोलीसांनी सांगितले.