वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो सांगून २४ लाख रुपयांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
यवतमाळ – राज्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले आहेत. अशीच एक घटना यवतमाळ परिसरात घडली आहे. मुलीला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी ५३ लाख रुपये डोनेशन स्वरूपात मंत्रालयातील सचिवाने घेतले. महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मात्र त्यासाठी लागणाऱ्या फिची रक्कम कमी होती. उर्वरित रक्कमेची मागणी केल्यानंतर देखील मिळाली नसल्याने त्या सचिवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या दिग्रस येथील शिक्षक श्याम महाजन यांच्या मुलीने २०२१- २२ मध्ये एनईईटी परीक्षा दिली होती. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. दरम्यान, त्यांचा मित्र शिवाजी कानपुरे यांच्याकडील कार्यक्रमात मंत्रायलात सचिव असलेले प्रवीण राडे यांची भेट झाली. मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून त्यांनी मुलीचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित करून देवू, असे सांगितले. त्यासाठी एक कोटी रुपये डोनेशन स्वरूपात मागितले होते.
५३ लाख टाकले खात्यावर इतक्या मोठ्या प्रमाणातील रक्कम देण्यास त्यांनी नकार दर्शविला. यामुळे ७५ लाख डोनेशन देण्याचे ठरले. हे निश्चित झाल्यानंतर टप्प्या- टप्प्यात मुलीचे वडील श्याम महाजन यांनी रोडे याच्या खात्यावर ५३ लाख रुपये वळते केले. या पैशात महाविद्यालयाची फी, राहण्याची व्यवस्था आदींचा समावेश असल्याचे सुद्धा सांगितले. दरम्यान, रोडे यांनी २०२२ ते २०२४ या कालावधीत नागपूर येथील दत्ता मेघे मेडिकल महाविद्यालयात २८ लाख ७५ हजारांचा भरणा केला. उर्वरित २४ लाख २५ हजार रुपये शिल्लक राहिले आहेत. उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता, रोडे याच्याकडून उडवाउडविचे उत्तरे देण्यात आली. यावरून २४ लाख २५ हजाराने फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. या प्रकरणी श्याम महाजन यांनी प्रवीण राडे याच्या विरोधात दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहार. पुढील तपास पोलीस करीत आहेत.