पुण्यात कांग्रेस – भाजप आमने सामने !

Spread the love

पुण्यात कांग्रेस – भाजप आमने सामने !

पुण्यात फुल्ल राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकल अडवली; भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनमध्ये घुसण्याचा प्रयत्न

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा-पुणे लोकल ट्रेन अडवून आपला रोष व्यक्त केला. एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे भाजप समर्थकही आक्रमक झाले. पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनची वाट धरल्याने काँग्रेस आणि भाजप समर्थक आमने-सामने आले. पुण्यातील बालगंधर्व चौकात हा राडा झल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. काँग्रेस भवनमध्ये आम्ही जाणारच, राहुल गांधी-सोनिया गांधी यांना अटक करा, अशी भूमिका भाजप समर्थकांनी केली तर, काँग्रेस समर्थकही काठ्या घेऊन रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्यात काँग्रेस भवनच्या समोर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. त्यासाठी, भाजप कार्यकर्ते बालगंधर्व चौकात जमले त्यामुळे काँग्रेस भवन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरापासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. काँग्रेस भवनावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले त्यामुळे, पुण्यात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरुन जोरदार राडा पाहायला मिळत आहे. काँग्रेसने २००० कोटी रुपयांचा घोटाळा केला असून आता फेक नेरेटीव्ह पसरवण्यात येत आहे. त्यामुळे, सोनिया गांधी व राहुल गांधी यांना अटक करावी, अशी आमची मागणी असल्याचं भाजप समर्थकांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon