मुंबईत ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अंमली पदार्थांचा नाश – “ड्रग-फ्री मुंबई” कडे मोठा टप्पा
मुंबई – “१०० दिवसांचा कृती आराखडा” या महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत दाखल १३० न्यायप्रविष्ट गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. यात एकूण ५३० किलो वजनाचे अंमली पदार्थ व ४,४३३ कोडीन मिश्रित बाटल्या समाविष्ट असून, त्यांची एकूण अंदाजित किंमत ५० कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. हा नाश ०८ एप्रिल २०२५ रोजी, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त “मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड”, तळोजा, पनवेल, रायगड येथील बंदिस्त भट्टीत पर्यावरणीय निकषांचे पालन करून करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई मुंबई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर यांच्या मान्यतेने आणि विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) श्री. सत्य नारायण व घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीचे अध्यक्ष श्री. सत्य नारायण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली.
पोलीस उप आयुक्त (प्रतिबंधक) श्री. अमोघ गावकर, पोलीस उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) श्री. शाम घुगे, रासायनिक तज्ज्ञ, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना, प्रभारी पोलीस निरीक्षक (भांडारगृह) श्री. बाळासाहेब शिंदे आणि इतर कर्मचारी शेडगे, निकम, चव्हाण, नाईक व जाधव यांचा सहभाग होता. मुंबई पोलीस “ड्रग-फ्री मुंबई” या उद्दिष्टासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही अशाच कठोर कारवायांद्वारे समाजाला नशामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.