डोंबिवलीत चोरी, घरफोडी करणा-या गुन्हेगारांच्या मुसक्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या 

Spread the love

डोंबिवलीत चोरी, घरफोडी करणा-या गुन्हेगारांच्या मुसक्या मानपाडा पोलिसांनी आवळल्या 

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – डोंबिवलीत पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. परिमंडळ -३ चे डॅशिंग पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्याचं काम सातत्याने केलं आहे. तरीसुद्धा गुन्हेगार गुन्हे करीत आहेत. मानपाडा पोलीस स्टेशन गु. रजि. क्रमांक ३४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयातील अज्ञात चोरट्यांचा मानपाडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक व गुप्त बातमीदाराचे मार्फतीने शोध घेवुन आरोपी १) जुनेद मोहम्मद खान, वय. २९ वर्ष, रा. रूम नं. ३, उमा अपार्टमेंट, नसीमबाग हॉल जवळ, अमृतनगर, मुंब्रा जि. ठाणे २) साजिद सलिम खान, वय. ३५ वर्ष, रा. रूम नं. ६, गरिब नवाज बिल्डींग, एमएम व्हिला जवळ, कौसा, मुंब्रा जि. ठाणे ३) फजल उर्फ फैजल आयुब कुरेशी, वय. २९ वर्ष, रा. रूम नं. २०२, फकिर शाह बिल्डींग, खडी मशिन रोड, मुंब्रा जि. ठाणे ४) अकलीम अस्लम डोलारे, वय. ३० वर्ष, रा. डोलारे हाउस, पटवर्धन वाडा, दुधनाका, कल्याण पश्चिम यांना मुंब्रा कल्याण भागातून ताब्यात घेवून त्यांच्याकडे सदर गुन्हयाबाबत तपास करुन त्यांना दिनांक ०२/०४/२०२५ रोजी १७:०३ वा. अटक करून त्यांच्याकडुन सदर गुन्हयातील व इतर ०२ गुन्हयातील २,१०,०००/- रू. किमतीचे डिझेल, रोख रक्कम, चार प्लास्टीकचे ड्रम, तसेच गुन्हयात वापरलेली एक इंडिका व्हिस्टा कार नं. एमएच ०४ ई एच ६७१२ असा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

आरोपी फजल उर्फ फैजल आयुब कुरेशी, वय २९ वर्ष, रा. रूम नं. २०२, फकिर शाह बिल्डींग, खडी मशिन रोड, मुंब्रा जि. ठाणे याच्याकडून प्रमाणे गुन्हे उघडकिस आणण्यात आले असून त्यापैकी १) मानपाडा पोलीस स्टेशन गु.रजि. क्रमांक २९४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५,३३१ (३),३३१ (४) प्रमाणे, २) मानपाडा पोलीस स्टेशन गु. रजि. क्रमांक ३१५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५,३३१(३),३३१ (४) प्रमाणे, ३) विष्णूनगर पोलीस स्टेशन गु. रजि. क्रमांक ८९६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३ (५) प्रमाणे आहे.

सदरची कारवाई श्री. अतूल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परी-३, कल्याण, श्री. सुहास हेमाडे सपोआ डोंबिवली विभाग, वपोनिरी श्री. विजय कादबाने, पोनि रामचंद्र चोपडे (गुन्हे), पोनि श्री. दत्तात्रय गुंड (प्रशासन), पो.निरी गिरासे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेश राळेभात, सपोनिरी/संपत फडोळ, पोहवा सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, शिरीष पाटील, सुजु मासाळ, विकास माळी, सुनिल पवार पोना गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यलप्पा पाटील, पोकॉ गणेश बडे, नाना चव्हाण, घनश्याम ठाकूर, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon