एकनाथ शिंदेंवरील गीत विडंबन प्रकरण; कुणाल कामराविरोधातील ३ गुन्हे खार,मुंबई पोलिसांकडे वर्ग

Spread the love

एकनाथ शिंदेंवरील गीत विडंबन प्रकरण; कुणाल कामराविरोधातील ३ गुन्हे खार,मुंबई पोलिसांकडे वर्ग

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – राज्याच्या राजकारणात तुफान निर्माण करणाऱ्या कुणाल कामरावर वेगवेगळ्या ठिकाणी ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधातील तीन गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात यापूर्वीच एक गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार मुरजी पटेल तक्रारदार आहेत. तर दुसरा गुन्हा मनमाड येथील शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याशिवाय तिसरा गुन्हा जळगावचे शिवसेना शहरप्रमुख संजय भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरणही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. नाशिक नांदगाव इथले सुनील जाधव यांच्या तक्रारीप्रकरणा दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आता एकत्रित करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील कुणालच्या

विडंबनात्मक गीतामुळे राज्यात नवा वाद उद्भवला होता. या गीतेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली होती. मात्र त्याबद्दल माफी मागणार नसल्याचं म्हणत कुणाल सोशल मीडियावर दररोज एक व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे. मंगळवारी त्याने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर कुणालने सीतारमण यांच्याबद्दलचाही व्हिडीओ पोस्ट केला होता. विविध राजकीय नेत्यांवर विडंबनात्मक गीत सादर करून खळबळ उडवून देण्यात कुणाल कामरा नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon