उल्हासनगर महापालिका अभियंत्यावर निलंबनाची कारवाई; आयुक्तांच्या नोटीसीला दाखविली केरांची टोपली

Spread the love

उल्हासनगर महापालिका अभियंत्यावर निलंबनाची कारवाई; आयुक्तांच्या नोटीसीला दाखविली केरांची टोपली

योगेश पांडे / वार्ताहर 

उल्हासनगर – शहर अभियंता पदावरून मूळ कनिष्ठ अभियंता पदावर गेल्या महिन्यात बदली केल्यानंतर, आयुक्तानी विकास कामाबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविली. कारणे दाखवा नोटीसीचा खुलासा केला नसल्याचा ठपका ठेवून आयुक्तानी तरुण सेवकांनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता तरुण सेवकांनी यांची तत्कालीन आयुक्तानी वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून थेट शहर अभियंता व कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी पदभार दिला होता. गेल्या महिन्यात आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नेताजी उर्फ प्रभात गार्डनची पाहणी केल्यावर कोट्यावधी रुपये खर्चूनही गार्डनचा विकास दिसला नाही. त्यांनी गार्डन कामाबाबत चौकशी नियुक्त केली होती. तसेच सेवकांनी यांची प्रभारी शहर अभियंता पदावरून थेट मूळ कनिष्ठ पदावर बदली केली. दरम्यान आयुक्तानी गेल्या ३ वर्षात पूर्ण झालेल्या कामाची अद्याप पर्यंत देयके

सादर केली नाही. तसेच अद्याप सुरु न झालेली कामे रद्द केली नाही. याबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविली सेवकांनी यांना बजाविली होती. मात्र या नोटीसीचा खुलासा केला नसल्याचा ठपका ठेवून सेवकांनी यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली.

आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सेवकांनी यांचे निलंबन केल्याने, प्रभारी पदभार सांभाळणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यात खळबळ उडाली. तसेच चुकीचे काम केल्यास, कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा या कारवाईतून आयुक्तानी दिल्याचे बोलले जात आहे. असंख्य अधिकाऱ्याच्या तक्रारी आल्या असून त्यांच्यावरही कारवाईचे संकेत आयुक्तानी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon