गॅस हुंगून तरुणाची आत्महत्या, दारावर धोक्याच्या सूचना; वसईतील हादरवणारा प्रकार

Spread the love

गॅस हुंगून तरुणाची आत्महत्या, दारावर धोक्याच्या सूचना; वसईतील हादरवणारा प्रकार

योगेश पांडे / वार्ताहर

वसई – वसईतील आत्महत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई पूर्वेच्या कामण परिसरातील एका बंगल्यात भाड्याने राहणार्‍या एका तरुणाने सिलिंडरमधील कार्बनमोनॉक्साईड वायू हेल्मेट घालून ‘नेब्यूलायझर’ च्या साहाय्याने हुंगून आत्महत्या केली आहे. श्रेय अग्रवाल (२७) असं या तरुणाचं नाव असून, आपण एका गंभीर आजाराने आत्महत्या करत असल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ही नोट दाराजवळील भिंतीवर चिकटवून ठेवली होती. आपल्या आत्महत्येनंतर त्याठिकाणी वायूदुर्घटना होऊ नये यासाठी त्याने घराच्या खिडक्या बंद करून, ठीक ठिकाणी धोक्याच्या सूचना लावल्या होत्या. कामण येथील स्पॅनिश व्हिला परिसरातील क्लस्टर ०९ या बंगल्यात बुधवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह सिलिंडरसोबत बांधलेला आढळला. श्रेयस सोबत त्याच्या कुटुंबीयांचा दोन दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्याच्या बहिणीने मुंबई पोलीस आयुक्तांना ईमेलद्वारे भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने त्याचा तपास सुरू केला असता त्याचे मोबाइलचे लोकेशन वसईच्या कामण येथे सापडले. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने याबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. नायगाव पोलीस बंगल्यात मागील एक वर्षांपासून भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नायगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले असता बंगला पूर्ण बंद होता आणि आतून दुर्गंधी येत होती. यावेळी पोलिसांना दरवाज्यावर इंग्रजीमध्ये सावधगिरीची सूचना देणारी चिठ्ठी लावलेली आढळली. यामध्ये बंगल्यामध्ये कार्बनमोनॉक्साईड वायू पसरला असून दिवे लावू नका अन्यथा स्फोट होईल असे इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी दाराला चिकटवलेले आढळली. त्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाला पाचारण केले. कार्बन मोनॉक्साईड हा प्राणघातक वायू असल्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी पीपीई किट आणि श्वसनासाठी लागणारा बीए सेट वापरून हायड्रोलिक स्प्रेडर कटरच्या साह्याने बेडरूमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांना आणि पोलिसांना श्रेयसने कार्बन मोनॉक्साईड सिलिंडरची योग्यरीत्या मांडणी करून नेब्यूलायझरचा वापर करून तोंडाद्वारे शरीरात ओढून घेतला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सावधानपूर्वक हाताळून त्याच्या तोंडातली नळी चाकुने कापून त्या सिलिंडरच्या जोडणीपासून वेगळा त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon