वाल्मिकच्या मर्जीतील २६ पोलिसांचं टेन्शन वाढलं, ‘तो’ पेनड्राईव्ह तपास अधिकाऱ्यांच्या लागला हाती
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – वाल्मिक कराड याच्या जवळ असलेल्या पोलिसांचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांनी सोमवारी ते पुरावे पोलिसांना दिले आहेत. तृप्ती देसाई यांनी सोमवारी बीडमध्ये जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीय २६ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात पुरावे दिले आहेत. त्यांनी यावेळी एक पेन ड्राईव्ह दिला आहे. वाल्मिक कराड यांच्या मर्जीतील २६ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातील सर्व पुरावे पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत. त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली. सोमवारी तृप्ती देसाई यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची भेट घेऊन हे पुरावे दिले.
तृप्ती देसाई म्हणाल्या, बारा प्रश्नांचे जवळपास उत्तर लिहून घेतले आहेत. काही पुरावे पेन ड्राईव्ह माध्यमातून व्हिडिओ आणि फोटो दिले आहेत. लवकरात लवकर या २६ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत बीड जिल्ह्याच्या बाहेर त्यांना पाठवला जावे. अनेक कर्मचारी चुकीचे काम करत आहेत. गोपनीय चौकशी करून तातडीने यावरती कारवाई करू असं आश्वासन दिले आहे. माझा अर्ज गेल्यानंतर २६ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला कुठला कर्मचारी मी चूक केली असे म्हणणार आहे. नवनीत कावत यांच्याकडून अपेक्षा आहेत. आपण ताबडतोब या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना कारवाई करावी अधिवेशन सुरू आहे अजितदादा पालकमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणाची हय गय केले जाणार नाही. अधिवेशन संपण्याच्या अगोदर कारवाई करावी म्हणजे चांगला मेसेज जाईल अशी मागणी ही तृप्ती देसाई यांनी केली