राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल; गर्भपात करण्यास दबाव
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांच्या पुतण्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यामध्ये माजी गृहराज्यमंत्र्याच्या पुतण्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार २९ वर्षीय तरुणीने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणी ठाण्यातील आहे, त्या तरुणीची ओळख पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत होती, तिने दिलेल्या तक्रारीनुसार या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस तपास करत आहेत. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पृथ्वीराज पाटील आरोपीचे नाव असून डॉ. डी. वाय. पाटील यांचे ते नातू आहेत. कापूरबावडी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप आहे. उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या २९ वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार झाल्याची माहिती दिली आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि प्रामुख्याने पाटील यांच्या कोल्हापुरातील बंगल्यावर हे प्रकार घडले असल्याची माहिती आहे. अनेकवेळा तिच्यावर हल्लाही करण्यात आला. धमकावून तिला कोल्हापुरात गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप पीडितेने कापूरबावाडी पोलिस ठाण्यात ७ मार्चला दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. पीडित तरुणीने पोलिसांना गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा अहवाल आणि तिच्यासोबत केलेल्या चॅटिंगचा पुरावाही दिला असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने पोलिसांना गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा अहवाल आणि तिच्यासोबत केलेल्या चॅटिंगचा पुरावा देखील दिला आहे. आरोपी पृथ्वीराज हा संजय पाटील यांचा मुलगा असून डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त देखील आहेत. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.