लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन बांगलादेशीय महिलांसोबत राहणाऱ्या दोन पुरुषांना देखील पोलिसांनी केली अटक
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ – सध्या देशात बांगलादेशीय घुसखोर नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. असेच बांगलादेशीय घुसखोर ठाणे जिल्ह्यात वावरताना दिसतात. अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीरपणे बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंबरनाथ तालुक्यात वास्तव्याला असलेल्या दोन बांग्लादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तसेच या महिलांना आश्रय देत त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप राहत असलेल्या दोन पुरुषांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील अनेक भागात बांगलादेशी व रोहिंगे बेकायदेशीर वास्तव्यास आहेत. अशा बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रामुख्याने कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात अधिक बांगलादेशी आढळून आले आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत आले.
त्यानुसार उल्हासनगर गुन्हे शाखेने अंबरनाथ तालुक्यातून दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अंबरनाथ तालुक्यातील आडीवली ढोकळी गावात फर्जाना शिरागुल शेख (वय ३६) हि महिला वास्तव्याला होती. हि महिला २३ वर्षांपूर्वी बेकादेशीरपणे भारतात प्रवेश करून ताहीर यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तसेच बीथी उर्फ प्रिया नूर इस्लाम अख्तर (वय २४) हि तरुणी मागील एक वर्षांपासून बेकादेशीरपणे भारतात वास्तव्याला होती. ती सुद्धा आडीवली ढोकळी परिसरात गणेश याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याबाबत उल्हासनगर गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर पथकाने या दोन बांग्लादेशी महिलांसह त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या दोन पुरुषांनाही बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांविरुद्ध पारपत्र अधिनियम, विदेशी व्यक्ती अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.