अँटॉप हिल वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने नवीन कायद्यांवरील कार्यशाळेचे आयोजन
मुंबई – महाराष्ट्र सरकारने अंमलात आणलेल्या तीन नवीन कायद्यांबद्दल जनजागृती आणि प्रचाराच्या उद्देशाने अँटॉप हिल वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने गुरु नानक विधी महाविद्यालय, जी.टी.बी. नगर, अँटॉप हिल, मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सकाळी १०:०० ते दुपारी १२:४५ या वेळेत पार पडली.
या कार्यशाळेत गुरु नानक विधी महाविद्यालयाचे २२ विद्यार्थी, २५ नागरिक, अँटॉप हिल वाहतूक पोलिस विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक वायसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक कराड आणि १५ पोलिस कर्मचारी तसेच माटुंगा वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक वाल्मीक पाटील, सपोनि फोलाने, पोलिस उपनिरीक्षक लोखंडे आणि १८ पोलिस कर्मचारी उपस्थित होते. एकूण ८५ प्रशिक्षणार्थींनी या सत्रात सहभाग घेतला.
या कार्यशाळेत ख्यातनाम विधी तज्ज्ञांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले –
१. डॉ. नूरुद्दीन खान (प्राचार्य, गुरु नानक विधी महाविद्यालय) – भारतीय न्याय संहिता २०२३ (बीएनएस)
२. प्राध्यापक अॅड. दीपक पाशी – भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०@३ (बीएनएस एक्स)
३ प्राध्यापिका अॅड. श्रुतिका पंदिरे – भारतीय साक्ष्य अधिनियम २
२०२३ (बीएसया)
प्रशिक्षणादरम्यान, माजी भारतीय दंड संहिता (भादवी ), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) भारतीय साक्ष्य अधिनियम आणि नवीन कायद्यांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी माहिती देण्यात आली. प्रशिक्षकांनी नवीन कायद्यांचे पोलिस आणि सामान्य नागरिकांवरील प्रभाव यावर विशेष भर दिला तसेच हे कायदे लागू करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी पोलिस निरीक्षक वायसिंग पाटील यांनी उपस्थित प्रशिक्षक व मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यशाळेच्या शेवटी गुरु नानक विधी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी कुमारी शांता लक्ष्मी हिने आभार प्रदर्शन केले, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांना पाणी आणि चहा वितरित करण्यात आले अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील यांनी सांगितले आहे.