अहिल्यानगरमध्ये कोट्यवधी रुपयांना चुना; आरोपींवर गुन्हा दाखल

Spread the love

अहिल्यानगरमध्ये कोट्यवधी रुपयांना चुना; आरोपींवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

अहिल्यानगर – राज्यात ठिकठिकाणी फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. फसवणूक करणाऱ्या भामट्याना कायद्याचा धाक उरलेला दिसत नाही. अशीच एक घटना घडली आहे. जमीन नावावर असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून शेवगाव येथील व्यापार्‍याची २ कोटी ६६ लाख ६२ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अलिकडच्या काही वर्षात नगर शहरात ताबेमारी, फसणूक करून घरे, फ्लॉट, जमीन यांच्या विक्रीतील फसवणूकीच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, नगरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात जयप्रकाश एकनाथ धूत (वय ४२ रा. मारवाड गल्ली शेवगाव) असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पवन पीटर पाटोळे, अनिता पीटर पाटोळे उर्फ अनिता दीपक वाघमारे, क्रांती पीटर पाटोळे, प्रियंका पिटर पाटोळे उर्फ प्रियंका संदीप खंडागळे सर्व रा. ख्रिस्ती गल्ली तारकपूर यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४१७, १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयप्रकाश धूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ४ फेब्रुवारी २०२० रोजी न्यायालयाने रेगुलर सिव्हिल अपील क्रमांक ३२८/ २०१५ चा निकाल देऊन पूर्वी पवन पाटोळे व इतरांच्या बाजूने न्यायालयाने दिलेला १८२/ २००३ मधील निकाल रद्द केला. याची पूर्ण कल्पना असतानाही केवळ महापालिकेकडून नमूद क्षेत्रास सिटी सर्वे दप्तरी त्यांचे नाव लावण्यास उशीर झाल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी कट कारस्थान करून सदरची जमीन त्यांच्या नावावर आहे, असे आम्हाला भासवून त्यांच्या मालकीची नसलेली जमीन आम्हाला ४ ऑक्टोबर २०२२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग दोन येथे खरेदी खत दस्त क्रमांक ८२३८/२०२२ अन्वये विक्री केली. त्या बदल्यात आमच्याकडून वेळोवेळी दोन कोटी ६६ लाख ६२ हजार ८०० रुपये घेऊन आमची फसवणूक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon