मीरा-भायंदर येथे मेराकी थाई स्पावर मीरा-भायंदर पोलिसांची धाड; स्पाचा चालक-मालक सॅमपीटर एस. नाडरवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
भाईंदर – एक एन.जी.ओ. चालवणाराच निघाला वेश्याव्यसायचा म्होरक्या. सॅम पीटर एस.नाडर हा स्वताला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार अशी ओळख सांगून ठाणे, नवीमुंबई, मुंबई, मीरा-भायंदर येथील लेडीस बार, लॉजिंग, स्पा सेंटर यांना खोटी तक्रार करण्याची धमकी देत त्यांच्याकडून खंडणी घ्यायचा व त्याच खंडणीच्या पैश्यातून त्याने ठाणे, मीरा भायंदर येथे स्वताचे स्पा चालू करून अल्पवयीन मुलींना मसाज च्या नावाखाली वेश्याव्यसाय करून घ्यायचा या गोरखधंद्याची माहिती एका १६ वर्षीय मुलीने एका एन जी ओ ला दिली, यात तिने खुलासा केला आहे कि, सॅमपीटर एस.नाडर याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिचे काही नग्न अवस्थेतले फोटो काडून तिला ब्लॅकमेल करून वेश्याव्यसाय करण्यास भाग पाडले होते, नाडरवर गुन्हा दाखल झाल्या पासून हा कथित स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार फरार आहे. याबाबत कणकीया मीरारोड पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर क्रमांक ७९/२०२५ दाखल आहे व आणखीन तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनला लवकरच दाखल होणार आहेत, तरीही ह्या फोटोतला इसम सॅमपीटर एस. नाडर कोणालाही दिसला तर मीरारोड पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा यावे कारण ह्याच्या सारख्या नराधामाची जागा फक्त कारागृहातच असली पाहिजे. जर हि व्यक्ती बाहेर राहिली तर अल्पवयीन मुलींचे भवितव्य धोक्यात राहील, यापूर्वी नराधमाने ठाण्यातल्या कापूरबावडी येथील अवलौन स्पा येथी बऱ्याच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे व त्याला साथ द्यायची त्याची प्रेयसी पवार ही सुद्धा ऑक्टोबर महिन्यापासून फरार आहे तिच्यावर पण पिटा अंतर्गत कारवाई झाली होती. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.