कोम्बिंग ऑपरेशनवरुन परतणाऱ्या पुणे पोलिसावर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पोलीस सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. कोम्बिंग ऑपरेशनहून परत येत असताना पोलिसाला चार जणांनी मारहण केल्याची घटना उघड झाली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रूपेश मांजरेकर, अनिकेत घोडके, आणि अभिजीत डोंगरे असे अटक केलेल्या आरोपींचे नावं आहेत. मारहणार करणारे सर्व आरोपी दारुडे असल्याची माहिती मिळत आहे.