भिवंडित प्रतिबंधित औषधांचे पेव फुटले, कफ सिरपचे ३१ लाखांचे रॅकेट उघड; नारपोली पोलिसांकडून ५ जणांना घेतले ताब्यात
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – भिवंडी जिल्ह्यात तब्बल ३१.७५ लाख रुपयांच्या बंदी घातलेल्या कफ सिरपच्या बाटल्या बेकायदेशीरपणे बाळगल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांचा अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची वयोमर्यादा २४ ते २५ वर्ष असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात ३१.७५ लाखांच्या बंदी असलेले दोन प्रकारचे कफ सिरप मोठ्या संख्येने बेकायदेशीरपणे साठवण करुन ठेवल्याचं आढळून आलं. या औषधांचा समावेश असलेल्या कफ सिरप अर्थात खोकल्याच्या सिरपचा अनेकदा नशेसाठी गैरवापर केला जातो. यामुळे लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो.
नारपोली पोलीस स्टेशनमधून दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे ३१ जानेवारी रोजी भिवंडीतील पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कफ सिरपच्या १७ हजार ६४० बॉटल जप्त करण्यात आल्या. यात कोडीन फॉस्फेट अर्थात हे एक प्रकारचं अफीम असतं. आणि दुसरं हे रसायन होतं. या दोन प्रकारच्या बॉटल १४७ बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. या १७ हून अधिक बॉटल्सची बेकायदेशीर विक्री करण्यात येणार होती. पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी बोलताना सांगितलं, की आरोपींनी हा कफ सिरपच्या औषधांचा स्टॉक कुठून मिळवला आणि ते हा स्टॉक कोणाला विक्री करणार आहे याचा तपास सुरू आहे. या बंदी असलेल्या कफ सिरपचा कशासाठी वापर केला जाणार होता? ते कोणापर्यंत बेकायदेशीपणे पोहोचणार होतं? याचा तपास सुरू आहे. याप्रकरणात जशी-जशी माहिती मिळेल, तसं इतर आरोपींना ताब्यात घेतलं जाईल. हे सर्व आरोपी २४ ते २५ वयोगटातील आहेत. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरोधात नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेन्स (एनडीपीएस) कायदा आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्टच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.