पुण्यात पुन्हा विचित्र अपघात, सुसाट चालकाने अनेक वाहनांना उडवले; सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही

Spread the love

पुण्यात पुन्हा विचित्र अपघात, सुसाट चालकाने अनेक वाहनांना उडवले; सुदैवाने कोणतीही जीवीतहानी नाही

योगेश पांडे – वार्ताहर 

पुणे – पुणे शहरात अधूनमधून अपघाताचे थरार होत असतात. सुसाट वाहनांनी अनेक वाहनांना धडक दिल्याचे प्रकार यापूर्वी पुण्यात घडले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला होता. कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली होती. या घटनेत १० ते १५ जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. एका पिकअप चालकाने अनेक वाहनांना उडवले आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. ताथवडे-पुनावळे रस्त्यावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली. या धडकेत पिकअपचे चाक निखळले. त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला अन पार्क असलेल्या दुचाकीला ही पिकअपने ठोकले.

ताथवडे-पुनावळे रस्त्यावर झालेल्या या या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon