कल्याण शीळ रस्त्यावरील बारमध्ये नंगानाच, मानपाडा पोलिसांनी ४० जणांना दाखवला इंगा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण-शीळ रस्त्यावर मोठया प्रमाणात डान्सबार असून त्या अनेक बारमध्ये अश्लील नृत्य व प्रकार घडत असतात. डान्सबार मालक पोलिसांना मॅनेज करत असल्याने पोलीस त्याकडे कानाडोळा करत असतात. यामुळे डान्सबार मालक त्यांच्या बारमध्ये बिनबोभाट गैरकृत्य करीत असतात असाच प्रकार कल्याण – शीळ रस्त्यावरील एका बारमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १४ जानेवारीला मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या छापेमारीत बारमध्ये अश्लील कृत्य सुरू असल्याचं प्रकार आला आहे. या प्रकरणी मनपाडा पोलिसांनी एकूण ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका बारमध्ये अशाप्रकारे अश्लील प्रकार सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावर असलेल्या एका बारमध्ये महिलांकडून अश्लील कृत्य करून घेत असल्याची गुप्त माहिती डोंबवलीतील मनपाडा पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित बारवर बुधवारी मध्यरात्री छापेमारी केली. यावेळी बारमध्ये काही महिला आणि पुरुष नको त्या अवस्थेत आढळले आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मनपाडा पोलिसांनी एकूण ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात २३ आरोपी हे बारशी संबंधित आहेत. ज्यावेळी पोलिसांनी या बारमध्ये छापेमारी केली तेव्हा आठ ग्राहक बारमधील आठ महिलांसोबत नको त्या अवस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी या महिलांवर देखील गुन्हे दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.