पुण्यात सुसाट कंटेनरचा थरार, १० ते १५ जणांना उडवले, एकाचा पायच कापला

Spread the love

पुण्यात सुसाट कंटेनरचा थरार, १० ते १५ जणांना उडवले, एकाचा पायच कापला

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला आहे. एका सुसाट कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत १० ते १५ जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी आहेत. अपघातानंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी कंटेनरवर चढून चालकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाकण शिक्रापूर रोडवर गुरुवारी मोठा अपघात झाला. चाकनकडून शिक्रापूर दिशेने कंटेनर सुसाट निघाले. यावेळी रस्त्यात येणाऱ्या सर्व वाहनांना धडक देत पुढे जाऊ लागले. चाकण शिक्रापूर रोडवर सुरु असलेल्या या थराराची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करतानाचा थरार कॅमेरात काही वाहनधारकांनी कैद केला. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले. मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत राहिला. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले. या थरारक घटनेचे व्हिडीओ सुद्धा समोर येत आहेत. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केला. चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिलाय. शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे.

शेलपिंपळगाव येथे या गाडीने एक मोठा ट्रक व कारला उडवले. यात दुसऱ्या ट्रक खाली कार घुसली. या कंटेनरने चाकण येथे एका मुलीला धडक दिली. त्यात तिचा पाय शरीरा वेगळा झाला. सुमारे १० ते १५ जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon