दिव्यांग डब्ब्यात दिव्यांग नसलेल्या प्रवाशाला उतरण्यास सांगितल्याच्या रागातून प्रवाशाने चक्क आरपीएफ जवानाचा घेतला चावा

Spread the love

दिव्यांग डब्ब्यात दिव्यांग नसलेल्या प्रवाशाला उतरण्यास सांगितल्याच्या रागातून प्रवाशाने चक्क आरपीएफ जवानाचा घेतला चावा

योगेश पांडे/वार्ताहर 

वसई – मुंबई उपनगरीय रेल्वे म्हणजेच लोकलमध्ये अनेक घटना रोज घडत असता. कधी कुठे अपघात होतो, तर कुठे जागे वरून भांडणं होतात. विना तिकट प्रवास करणारे तर आलेच. रेल्वे पोलिसही कधी कधी कारवाई करत असतात. पण वसई रेल्वे स्थानकात अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. इथं एक प्रवाशी चक्क आपीएफ जवानाला चावला. त्यानंतर वसई रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला. हा प्रवाशी नक्की का चावला याची चर्चा सुरू झाली. मात्र ज्यावेळी त्याला पोलिस स्थानकात नेण्यात आले त्यावेळी सर्व गोष्टी उलगडल्या. डहाणू रेल्वे स्थानकातून डहाणू चर्चगेट हे लोकल सुटली. लोकल पुढे वसई स्थानकात आली. त्यावेळी स्थानकामध्ये आपीएफ ची एक तुकडी तैनात होती. हे लोकलचे डब्बे पहात होते. त्यावेळी दिव्यांगाच्या डब्या शेजारी ते होते. त्यावेळी या डब्ब्यात एक प्रवाशी बसला होता. त्याचा संशय त्यांना आला. तो दिव्यांग नव्हता. तरीही तो त्या डब्यात बसला होता. त्याला खाली उतरण्यास सांगण्यात आले. त्याने खाली उतरण्यास नकार दिला. त्या ऐवजी तो तिथेच बसून राहीला.

तो नंतर आरपीएफ जवाना बरोबर हुज्जत घालत होता. शेवटी एक जवान त्या डब्यात चढला. त्याने त्या प्रवाशाला खाली खेचली. त्याला तो पोलिस स्थानकात नेत होता. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. त्यानंतर रागाच्या भरात त्या प्रवाशाने थेट त्या जवानाच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे एकच गोंधळ त्या ठिकाणी उडला. अन्य आपीएफचे जवान तिथे जमा झाले. त्यांनी सर्वांनी पकडून त्याला शेवटी पोलिस स्थानकात नेले. तिथे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये दिव्यांगाचा डब्बा असेल किंवा सामानाचा डब्बा असेल अनेक जण त्यात बिंदास चढत असतात. त्यामुळे अनेक वेळा भांडणाची स्थिती निर्माण होते. दिव्यांगांच्या डब्ब्यात तर सर्रास अन्य प्रवाशी चढतात. त्यावेळी त्यांच्यात वाद होत असतात. हे वाद टळावे यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावलं उचलावीत अशा मागणी प्रवाशी करत आहेत. त्यात आता आरपीएफ जवानालाच चावा घेतल्यामुळे याबाबत रेल्वे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon