मानखुर्द पोलीस ठाण्यातील पोक्सो गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक

Spread the love

मानखुर्द पोलीस ठाण्यातील पोक्सो गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीला मानखुर्द पोलिसांनी काल अटक केली आहे. सदर आरोपी २०२४ पासून फरार होता. त्याचे नाव सागर लक्ष्मण कापसेकर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधु घोरपडे यानी सांगतले की, २०२४ मधे पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४८८/२०२४ कलम १३७ (२),६४(१),६४(१)(एम) बीएनएस एक्ट सह कलम ४,६,८,१० पोक्सो कलम अंतर्गत गुन्ह नोंद करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपीने फिर्यादी यांची मुलगी हीस सागर कापसेकर याने फुस लावून माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथून कॅटर्स चे काम देतो सांगून राहण्यास घेऊन गेला होता. तेव्हापासून तो फरार होता. मुलगी आईला भेटल्यावर रडू लागली म्हणून तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने सांगितले की, सागर याने तिला केटरर्स कामासाठी सदर ठिकाणी आणले व जबरदस्तीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असे सांगितले असता फिर्यादी या त्यांच्या पीडित मुलीला घेऊन मानखुर्द पोलीस ठाणे येथे पुढील कारवाईसाठी घेऊन आल्या असता आईचा जबाब नोंद करून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपी हा आपले अस्तित्व लपवून वारंवार ठिकाण बदलत होता तसेच तो वारंवार नवीन मोबाइल वापरून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करीत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात विलंब होत होता. दि. ११/०१/२०२५ रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी हा नौसील नाका, घणसोली गाव, नवी मुंबई परिसरात आला असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाल्याने तात्काळ सदर ठिकाणी निगराणी पथकाचे पोउपनि बनसोडे तसेच निगराणी पथकातील पो.शि.पवार, पो.शि.चौधरी यांनी सदर आरोपीस घणसोली, नवी मुंबई या ठिकाणावरून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. चेंबूर परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि पूर्व प्रादेशिक विभागचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटिल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी सागर लक्ष्मण कापसेकर हा घाटकोपर रमाबाई कॉलनीतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon