टोरेस’नंतर आणखी एक घोटाळा ! मुंबईत खळबळ, एक्वा मरीन ग्लोबल कल्चर या कंपनी कडून गुंतवणूकदाराला लाखोंचा चुना; कंपनीचा मालक विनय कांबळे पोलीसांच्या ताब्यात
योगेश पांडे/वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई येथील टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याने मुंबईकरांना मोठा धक्का दिला होता कारण या घोटाळ्यात मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये गुंतले आहेत. या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे. एक्वा मरीन ग्लोबल कल्चर असे फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख यांच्या फिर्यादीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. शेख हे मूळचे मुंबई अंधेरी शहरातील रहिवाशी आहे. शेख यांनी अंधेरीत असलेल्या एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीत जवळपास १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, गुंतवणूक करताना शेख यांना कंपनीने मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले होते, महिन्याला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर १५ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते, गुंतवणूक केल्या नंतर, शेख यांना दोन ते तीन महिने परतावा देखील मिळाला मात्र, परतावा मिळणे बंद झाल्या नंतर. शेख यांनी अंधेरी येथील कंपनीच्या ऑफिसला भेट दिली, मात्र कंपनीकडून उत्तर मिळत नसल्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यालय नवे मुंबईत आहे त्या कार्यालयात जाण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांनी दिली.
त्या नुसार शेख हे, खारघर येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात गेले, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिल्या मुळे, शेख यांचे समाधान झाले नाही. त्या मुळे त्यांनी थेट स्थानिक पोलीस स्टेशन गाठून , कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली, शेख यांच्या तक्रारी नंतर, खारघर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून, हा गुन्हा मुंबई अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासला सुरवात करत मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस खारघर यांनी शुक्रवारी संयुक्त कारवाई करत या कंपनीचे मालक विनय कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. सद्या कांबळे हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई पोलीस करत आहे. दरम्यान, खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्या नंतर, खारघर पोलिसांनी हा गुन्हा अंधेरी एम आय डी सी पोलिसा कडे वर्ग करण्यात आला. एम आय डी सी पोलिसांकडे वर्ग केल्या नंतर, मुंबई पोलीस आणि खारघर पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करून, कंपनीच्या मूळ मालक विनय कांबळे याला अटक केली आहे.