स्क्रिझोफेनियाच्या आजार असलेल्या आईकडून पोटच्या बाळाची गळा आवळून हत्या; वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपी आईला अटक

Spread the love

स्क्रिझोफेनियाच्या आजार असलेल्या आईकडून पोटच्या बाळाची गळा आवळून हत्या; वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपी आईला अटक

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – आई-वडील आपल्या मुलांसाठी, त्यांच्या रक्षणासाठी काहीही करू शकतात. पण, काही वेळा हेच पालक मुलांसाठी घातक ठरू शकतात, अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे येथे घडली आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्याच पोटच्या १० वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. वांद्रे येथील खेरवाडीमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे. अभिलाषा औटी (३६) असे महिलेचे नाव असून सर्वेश असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून पत्नीच्या या कृत्यामुळे आणि मुलाच्या मृत्यूमुळे सर्वेशचे वडील प्रचंड खचले आहेत. ते उप-सचिवपदी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली यामुळे वांद्रे येथे खेरवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औटी कुटुंब हे वांद्रे पूर्वेला असणाऱ्या खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहते. सर्वेशचे वडील उप-सचिव आहेत. अभिलाषा औटी यांना स्क्रिझोफेनिया हा आजार आहे. त्यामध्ये एखादी व्यक्ती कधीकधी अतिआक्रमकपणे तर कधी प्रेमळ वागते. गुरूवारी संध्याकाळी अभिलाषा व त्यांचा मुलगा सर्वेश दोघेच घरात होते. स्क्रिझोफेनियामुळे अभिलाशा यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. संध्याकाळी ७ च्या सुमारासा काही कारणावरून अभिलाषा यांचा रागाचा पारा चढला. त्याच रागाच्या भरात अभिलाषा यांनी सर्वेशला घराच्या बेडरूममध्ये खेचून नेलं, दाराला आतून कडी लावली. आणि एका वायरने सर्वेशचा गळा आवळला. या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी सर्वेशचे वडिल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अभिलाषा यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. अभिलाषा यांचे पती सरकारी कर्मचारी आहेत. ते उप-सचिव पदी कार्यरत असून सदर घटनेने फारच खचून गेले असल्याची महिती पोलिसांनी दिली. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon