धक्कादायक! माथेफिरू तरुणाने प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून केली निर्घृणपणे हत्या; त्यानंतर स्वतःही केली आत्महत्या

Spread the love

धक्कादायक! माथेफिरू तरुणाने प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून केली निर्घृणपणे हत्या; त्यानंतर स्वतःही केली आत्महत्या

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात एक धक्कादायक घटना घडली. एका माथेफिरू तरुणाने प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी १२ वर्षीय मुलाचे अपहरण केलं. आपल्यावर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी या माथेफिरू विकृत प्रेमीने प्रेयसीच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना संगमनेर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ डिसेंबर रोजी मयत विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण- १२ याचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत सापडला होता. तर आरोपी राजेंद्र जंबुकर – २६ याने संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेश रोहिदास जंबुकर याने बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून आर्यन चव्हाण या मुलाचं अपहरण केलं होतं. ज्या मुलाचं अपहरण झालं तो आर्यन चव्हाण हा आरोपी राजेश जंबुकर यांच्या प्रेयसीचा मुलगा होता. आधी आर्यनचा सर्वत्र शोध घेतला पण मुलगा कुठे सापडला नाही. अखेरीस आर्यनच्या वडिलांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही दाखल केली होती. यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता. पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. परंतु आरोपी राजेंद्र जंबुकर हा कुठेही मिळुन आला नाही.

मात्र मंगळवार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राजेंद्र जंबुकर याने ढोलेवाडी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती समोर आली. परंतु आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता. पारगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना मंगळवार २४ डिसेंबर रोजी उशिरा संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला. अनैतिक संबंधातून हे सर्व प्रकरण घडल्याचं बोललं जात आहे. ही सर्व घटना संगमनेर परिसरात घडली असल्याने आणि संगमनेर पोलिसांनी घटने संदर्भातील कागदपत्रं पाठवली नसल्याने आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलिसांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon