अवघ्या बारा तासात गुन्हेगाराला मुद्देमालासह जेरबंद, केळवा सागरी पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी 

Spread the love

अवघ्या बारा तासात गुन्हेगाराला मुद्देमालासह जेरबंद, केळवा सागरी पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी 

पालघर / नवीन पाटील 

पालघर जिल्ह्यातील सफाळे आगरवाडी नजीक असलेल्या विळंगी गावातील तारा सदानंद भोईर या वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या १२ तासात मुद्देमालासह जेरबंद करण्यात केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पथकाला यश आले आहे.

शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी तारा सदानंद भोईर (वय ६५) या वयोवृद्ध महिला आपल्या मोठे घर आळी विळंगी येथे घरातील काम करत असताना अनोळखी इसमाने त्यांच्या अंगावर व चेहऱ्यावर कपडा टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ व कानातील कुड्या असा एकूण २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करून त्यांना किरकोळ दुखापत करून पळ काढला होता. या घटनेची तक्रार केळवे सागरी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर व केळवे सागरी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यानंतर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोसावी, सहाय्यक फौजदार वसंत वळवी, पोलीस अंमलदार जयदीप सांबरे, पोलीस हवालदार नरेश जनाठे या टीमने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या बारा तासात गुन्हेगाराला विळंगी गावातून अटक करून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon